सीजेपी आंदोलनाला ‘इनफ इज इनफ’चा पाठिंबा : न्या. फेर्द‌िन रिबेलो

देशभरात होत असलेल्या एसआयआर प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आहेत. या विरोधात देशभरातील तरुण आंदोलन करत आहेत. आम्ही देखील या आंदोलनाला पाठिंबा देणार आहोत. ११ ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीतर्फे (सीजेपी) पणजीत होणाऱ्या आंदोलनात ‘इनफ इज इनफ’ सहभागी होणार आहे. राज्यातील अन्य समविचारी संस्था,राजकीय पक्षांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा द्यावा; असे आवाहन माजी न्या. फेर्द‌िन रिबेलो यांनी केले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
08th October, 01:47 pm
सीजेपी आंदोलनाला ‘इनफ इज इनफ’चा पाठिंबा : न्या. फेर्द‌िन रिबेलो

पणजी : देशभरात होत असलेल्या एसआयआर प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आहेत. या विरोधात देशभरातील तरुण आंदोलन करत आहेत. आम्ही देखील या आंदोलनाला पाठिंबा देणार आहोत. ११ ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीतर्फे (सीजेपी) पणजीत होणाऱ्या आंदोलनात ‘इनफ इज इनफ’ सहभागी होणार आहे. राज्यातील अन्य समविचारी संस्था,राजकीय पक्षांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा द्यावा; असे आवाहन माजी न्या. फेर्द‌िन रिबेलो यांनी केले.

 गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  रिबेलो यांनी सांगितले की, आमचे आंदोलन गोव्यातील वारसा, पर्यावरण, संस्कृती जपणे यासाठी आहे. त्याचसोबत आम्ही लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी देखील आंदोलन करत आहोत. ज्या व्यक्तींनी लोकशाहीचे रक्षण करणे अपेक्षित होते त्याच व्यक्ती आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत. लोकशाहीतील महत्त्वाच्या संस्था तडजोड करत आहेत.

अशा वेळी तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा देणे आम्हाला योग्य वाटते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपले कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडलेले नाही. त्यामुळे स्वतःहून राजीनामा देणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे.

ते म्हणाले, मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीमध्ये केंद्र सरकारचे दोन प्रतिनिधी आहेत. अन्य दोन आयुक्तांनी एसआयआर बाबत वेळोवेळी तक्रार करून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. माझे मतदान मुंबईमध्ये आहे. एसआयआर नंतर मला नोटीस आली आहे. एका मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला अशा नोटीस येत असतील तर अन्य लोकांचे काय झाले असावे याचा विचार करावा.

एसआयआरचा चुकीचा वापर केला जात आहे. प्रामुख्याने अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीयांची नावे मतदार यादीतून काढण्यासाठी या प्रक्रियेचा वापर केला जात आहे. या प्रक्रियेविरोधात आपण कायदेशीर मार्गाने आवाज उठवणे गरजेचे आहे.

हेही वाचा
सर्व पहा