पेडणे : पेडणे विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची (भाजप) उमेदवारी ज्या उमेदवाराला मिळेल, तोच उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून येईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. (Bjp candidate to win mla seat in Pernem says cm Dr. Pramod Sawant).
अटल भवन येथे आयोजित पत्रकारांच्या दिवाळी स्नेहमिलन सोहळ्यादरम्यान त्यांनी हे विधान केले. या स्नेहमिलन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधताना पेडणे विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीत भाजपची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार,या प्रश्नावर त्यांनी वरील भाष्य केले.
भाजपची उमेदवारी ज्या उमेदवाराला मिळेल, तोच उमेदवार आमदार म्हणून निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे पेडणे मतदारसंघातील आगामी निवडणुकीच्या उमेदवारीचा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पेडणे तालुक्यातील पेडणे आणि मांद्रे या दोन्ही विधानसभा मतदारसंघांकडे संपूर्ण गोमंतकाचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार, तसेच संभाव्य युतीच्या माध्यमातून कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
मांद्रे मतदारसंघात सध्या आमदार जीत आरोलकर यांचे नाव संभाव्य युतीच्या उमेदवाराच्या संदर्भात चर्चेत आहे. दुसरीकडे पेडणे विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर यांनाच भाजप पुन्हा संधी देणार की आगामी निवडणुकीत एखाद्या नव्या चेहऱ्याला उमेदवारी देऊन राजकीय समीकरण बदलणार, हा उत्सुकतेचा विषय बनला आहे.
पेडणे मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांना मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी उमेदवाराचे नाव स्पष्ट केले नसले, तरी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला निवडून आणण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीच्या निर्णयाकडे स्थानिक कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि मतदारांचे लक्ष लागले आहे.
पेडणे मतदारसंघात विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर यांची कामगिरी, पक्षातील संघटनात्मक समीकरणे, स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका आणि संभाव्य नवीन उमेदवारांची नावे या सर्व बाबी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार आहेत.
एकीकडे मांद्रे मतदारसंघातील युतीचे राजकीय गणित चर्चेत असताना दुसरीकडे पेडणे मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीचा पेच काय वळण घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा नेमका राजकीय अर्थ काय लावायचा आणि भाजपश्रेष्ठी पेडण्यात कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, हे येणारा काळच स्पष्ट करेल. भाजपची उमेदवारी म्हणजे विजयाची हमी, असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास असला तरी पेडणे मतदारसंघात पक्षाकडून कोणाला संधी मिळणार, याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे.
विशेष म्हणजे, पेडणे मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांना मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी उमेदवाराचे नाव स्पष्ट केले नसले, तरी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला निवडून आणण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीच्या निर्णयाकडे स्थानिक कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि मतदारांचे लक्ष लागले आहे.
पेडणे मतदारसंघात विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर यांची कामगिरी, पक्षातील संघटनात्मक समीकरणे, स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका आणि संभाव्य नवीन उमेदवारांची नावे या सर्व बाबी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार आहेत.
एकीकडे मांद्रे मतदारसंघातील युतीचे राजकीय गणित चर्चेत असताना दुसरीकडे पेडणे मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीचा पेच काय वळण घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा नेमका राजकीय अर्थ काय लावायचा आणि भाजपश्रेष्ठी पेडण्यात कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, हे येणारा काळच स्पष्ट करेल.
भाजपची उमेदवारी म्हणजे विजयाची हमी, असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास असला तरी पेडणे मतदारसंघात पक्षाकडून कोणाला संधी मिळणार, याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे.


