भोमवाडा, पालये येथे गव्याचा संचार; स्थानिकांमध्ये भीती

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न; गोव्यात जंगली जनावरे, प्राणी नागरी वस्तीत घुसू लागल्याने स्थानिकांची चिंता वाढू लागली आहे. भोमवाडा, पालये येथे भूमिका माध्यमिक विद्यालयाजवळ गवा आढळून आल्याने स्थानिकांमध्ये भीतीवे वातावरण पसरले आहे. गव्याच्या संचारामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
भोमवाडा, पालये येथे गव्याचा संचार; स्थानिकांमध्ये भीती

पेडणे : गोव्यात जंगली जनावरे, प्राणी नागरी वस्तीत घुसू लागल्याने स्थानिकांची चिंता वाढू लागली आहे. भोमवाडा, पालये येथे भूमिका माध्यमिक विद्यालयाजवळ गवा आढळून आल्याने स्थानिकांमध्ये भीतीवे वातावरण पसरले आहे. गव्याच्या संचारामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भोमवाडा येथे भूमिका माध्यमिक शाळेजवळ गवा फिरताना दिसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. गवा दिसताच काही नागरिकांनी त्याचे दृश्य मोबाईलमध्ये टिपले. 

दरम्यान, गोव्यात जंगली जनावरे, प्राणी नागरी वस्तीत घुसण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पेडणे परिसरात ओंमकार हत्तीचा उपद्रव स्थानिकांना सहन करावा लागत आहे. स्थानिकांची शेती, बागायतींचे हत्ती नुकसान करत आहे. त्यातच आता गव्याचा संचारही दिसू लागल्याने स्थानिकांची चिंता वाढली आहे.

स्थानिकांनी गवा किंवा अन्य कुठलेही प्राणी दिसल्यास त्यांच्याजवळ जाणे, त्यांना त्रास देणे किंवा त्यांचा पाठलाग करणे टाळावे, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे. 

हेही वाचा
सर्व पहा