नायकवाडा-कळंगुटमध्ये फ्लॅटला भीषण आग; ५ लाखांचे नुकसान

धुरामुळे गुदमरलेल्या चार जणांना अग्निशमन दलाने काढले सुखरूप बाहेर; नायकवाडा, कळंगुट येथील एका इमारतीमधील फ्लॅटला आग लागून सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. या धुरामुळे दुसऱ्या फ्लॅटमधील चारजण गुदमरले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
नायकवाडा-कळंगुटमध्ये फ्लॅटला भीषण आग; ५ लाखांचे नुकसान

कळंगुट : नायकवाडा, कळंगुट येथील एका इमारतीमधील फ्लॅटला आग लागून सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. या धुरामुळे दुसऱ्या फ्लॅटमधील चारजण गुदमरले.

घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बचावकार्य हाती घेत धुराने भरलेल्या फ्लॅटमधील चारही जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून फ्लॅटमधील आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ५ लाख रुपयांची आर्थिक हानी झाली आहे.

हेही वाचा
सर्व पहा