अभिनेते गोविंदा निवासस्थानी पडले बेशुद्ध : आता प्रकृती स्थिर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12th November 2025, 10:45 am
अभिनेते गोविंदा निवासस्थानी पडले बेशुद्ध : आता प्रकृती स्थिर

मुंबई : अभिनेते गोविंदा (Film star Govinda) मंगळवारी रात्री उशीरा राहत्या निवासस्थानी बेशुद्ध (Unconsious) पडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये (Hospital) दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे वकील व मित्रांनी सांगितले.

गोविंदा यांचे वकील व मित्र ललित बिंदल (Lawyer Lalit Bindal)  यांनी सांगितले की, बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले. आपत्कालीन विभागात नेण्यापूर्वी त्यांना अस्वस्थता वाटत होती.

गोविंदाच्या स्वास्थ्याबद्दल माहिती देताना बिंदल यांनी पुढे सांगितले की, बेशुद्ध पडल्यावर त्याच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या आहेत. आणि आता ‘न्यूरो कन्सल्टेशन’च्या अहवालाची वाट पाहत आहोत. वैद्यकीय टीमने संपूर्ण मूल्यांकन केले आहे व सध्या त्यांची स्थ‌िती स्थिर आहे.

पुढील खबरदारी घेण्यासाठी डॉक्टर ‘न्यूरोलॉजिकल कन्सल्टेशन’च्या अहवालाची वाट पाहत आहेत. दाखल करण्यात आल्यापासून कोणतीही गुंतागुंत झालेली नाही. 

यापूर्वी गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याच्या घटनेनंतर एका वर्षानंतर त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये परवानाधारक रिव्हॉल्वहर हाताळताना त्यांना अपघात झाला होता. रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून पायाला लागली होती. 

हेही वाचा