केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे म्हणजे एक प्रकारे कठीण गड सर करण्यासारखेच असते. पूर्व परीक्षा (Prelims) उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची (Mains) तटबंदी भेदणे ही खूप मोठी कामगिरी मानली जाते. परंतु, ही तटबंदी भेदल्यानंतरही सर्वात कठीण आणि अंतिम बालेकिल्ला जिंकणे बाकी असते आणि तो बालेकिल्ला म्हणजेच 'व्यक्तिमत्त्व चाचणी'अर्थात मुलाखत!
ज्याप्रमाणे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा एकाच दमाने पार पाडाव्या लागतात, तसेच या संपूर्ण परीक्षा पद्धतीचे वार्षिक वेळापत्रक पूर्ण शिस्तीने पार करावे लागते.
कशी असते मुलाखतीची रचना?
UPSC च्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दिल्ली येथील 'धोलपूर हाऊस' (UPSC मुख्यालय) येथे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाते. MPSC मध्येही राज्यसेवा परीक्षांमधील क्लास 'A' आणि क्लास 'B' च्या पदांसाठी पॅनेल मुलाखत घेतली जाते.
मुलाखती दरम्यान एका विशेष तज्ज्ञ पॅनेलसमोर उमेदवाराला साधारणपणे ४५ मिनिटे ते १ तास सामोरे जावे लागते. ही मुलाखत म्हणजे केवळ औपचारिक प्रश्नोत्तरे नसून, एका अनौपचारिक आणि सुसंस्कृत गप्पागोष्टींच्या स्वरूपात सुरू होणारी प्रक्रिया असते.
नेमकी कशाची होते तपासणी?
या मुलाखतीमध्ये उमेदवाराच्या पुस्तकी ज्ञानापेक्षा त्याच्या प्रशासकीय गुणांची आणि व्यक्तिमत्त्वाची सखोल पारख केली जाते.
प्रशासकीय गुण व विचारसरणी: विषयातून विषय निघत असताना उमेदवाराची मते, त्याला पूरक असणारी मते, विरुद्ध बाजूचा विचार, तटस्थ दृष्टिकोन, समतोल व्यवहार (Balanced Behaviour), आत्मविश्वास आणि निर्णयात्मक क्षमता तपासली जाते.
हॉबी किंवा छंदाची पारख: अनेकदा मुलाखतीची सुरुवात उमेदवाराने लिहिलेल्या हॉबी किंवा छंदापासून होते. तो छंद उमेदवाराने केवळ नावापुरता लिहिला आहे की त्यात त्याला खरंच रस आहे, हे तज्ज्ञ पॅनेल अतिशय बारकाईने पारखते.
प्रामाणिकपणा: सरकारी अधिकाऱ्याला विविध अडचणी आणि हतबल परिस्थितींना सामोरे जावे लागते. अशा वेळी उमेदवाराचा प्रामाणिकपणा सर्वात जास्त महत्त्वाचा ठरतो. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल, तर चुकीची माहिती देण्याऐवजी किंवा उत्तर ताणून धरण्याऐवजी "मला याबद्दल पुरेशी माहिती नाही" हे प्रामाणिकपणे कबूल करणे अधिक प्रशंसनीय मानले जाते.
आयोगाला कसा अधिकारी हवा असतो?
मुलाखत घेणाऱ्या आयोगाला कोणताही 'गुगल' सारखा चालता-बोलता माहितीचा साठा असलेला अधिकारी नको असतो. तर, त्यांना एका 'स्टेटसमन' पद्धतीचा अभ्यासू आणि विचारवंत अधिकारी हवा असतो.
जो अधिकारी धोरणी असेल, फायदा-तोट्याचा विचार करू शकेल, परिस्थितीचा सारासार विचार करून जनहितार्थ धोरणे (Public Policy) राबवू शकेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याच्यात संवेदनशील 'माणूस' जिवंत असेल, अशाच उमेदवाराचा शोध या मुलाखतीतून घेतला जातो.
थोडक्यात सांगायचे तर, स्पर्धा परीक्षेतील मुख्य परीक्षा ही तुमच्या अभ्यासाची परीक्षा असते; परंतु अंतिम मुलाखत ही तुमच्यातील 'माणूस' आणि 'भावी प्रशासक' शोधणारी एक



