गोवा उज्ज्वला योजनेचे अर्ज मिळवण्यासाठी कोरगाव पंचायतीत गर्दी

मोफत सिलेंडर योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 mins ago
गोवा उज्ज्वला योजनेचे अर्ज मिळवण्यासाठी कोरगाव पंचायतीत गर्दी

कोरगाव : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केलेल्या वर्षाला तीन मोफत एलपीजी (LPG) गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी पेडणे तालुक्यातील कोरगाव पंचायत कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या प्रसंगी पंचायत सदस्यांनी या शासकीय उपक्रमाचे स्वागत करत ही योजना गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. योजनेची प्रक्रिया सुलभरीत्या पार पाडण्यासाठी पंचायत प्रशासनाकडून आवश्यक ती प्रशासकीय व्यवस्था करण्यात आली होती. स्थानिक नागरिकांनीही या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

शासनाच्या या मोफत सिलेंडर योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. अशा जनहितैषी आणि लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित स्थानिक प्रतिनिधी आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा
सर्व पहा