कुंडई औद्योगिक वसाहतीत दोन स्कूटर्स-ट्रकचा भीषण अपघात: डिचोली येथील महिलेचा मृत्यू

कुंडई औद्योगिक वसाहतीत ट्रक व दोन स्कुटरच्या अपघातात डिचोलीच्या दिव्या मांजरेकर (३६) यांचा जागीच मृत्यू झाला, तर शिरोड्याचे ऋषभ नाईक जखमी झाले. फोंडा पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
1 hours ago
कुंडई औद्योगिक वसाहतीत दोन स्कूटर्स-ट्रकचा भीषण अपघात: डिचोली येथील महिलेचा मृत्यू

पणजी : कुंडई औद्योगिक वसाहतीत रविवारी सकाळी दोन स्कुटर आणि एका ट्रकदरम्यान झालेल्या भीषण अपघातात ३६ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. दिव्या दीपक मांजरेकर (वय ३६, रा. सुर्ला-पाल, डिचोली) असे मृत महिलेचे नाव असून, अपघातात आणखी एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंडई आयडीसी परिसरातील मुख्य रस्त्यावर दोन स्कुटर आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. अपघाताच्या वेळी एका दुचाकीवर मागे बसलेल्या दिव्या मांजरेकर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील चालक ऋषभ नाईक (रा. शिरोडा) हे जखमी झाले असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. कुंडई परिसरात गेल्या तीन दिवसांतील हा दुसरा जीवघेणा अपघात ठरला आहे.

औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यांवर होणारी अवजड वाहनांची सातत्यपूर्ण वर्दळ आणि त्यामुळे उद्भवणारी वाहतूक कोंडी अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अपघाताचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पुढील प्रशासकीय व कायदेशीर तपास वेगाने सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा