पणजी : कांदोळी समुद्रकिनारी शुक्रवारी एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५५ वर्षे आहे.
मृत व्यक्तीच्या अंगावर अर्ध्या बाह्यांचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅंट आहे. त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर लाल रंगाची खूण असल्याचे आढळून आले आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे कठीण जात आहे. समुद्रात बुडून मृत्यू पावल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मृत व्यक्तीच्या कपड्यांमध्ये कोणतेही ओळखपत्र किंवा ओळख पटवणारी कुठलीही कागदपत्रे आढळलेली नाहीत. कळंगुट पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवागृहात पाठवला. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती कळंगुट पोलिसांनी दिली.


