कांदा-बटाट्याच्या आडून दारूची तस्करी!; पत्रादेवी चेक नाक्यावर ट्रक पकडला

मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त; गोव्यातून महाराष्ट्राच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या दारूची वाहतूक करणारा ट्रक पेडणे येथील अबकारी चेक नाक्यावर पकडण्यात आला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये कांदे-बटाटे वाहतूक करत असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, या सामानाच्या खाली दारूचे बॉक्स लपवून ठेवण्यात आल्याचे समोर आले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
26 mins ago
कांदा-बटाट्याच्या आडून दारूची तस्करी!; पत्रादेवी चेक नाक्यावर ट्रक पकडला

पेडणे : गोव्यातून महाराष्ट्राच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या दारूची वाहतूक करणारा ट्रक पेडणे येथील अबकारी चेक नाक्यावर पकडण्यात आला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये कांदे-बटाटे वाहतूक करत असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, या सामानाच्या खाली दारूचे बॉक्स लपवून ठेवण्यात आल्याचे समोर आले.


अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकची सखोल तपासणी केली असता कांदे-बटाट्यांच्या खाली मोठ्या प्रमाणात दारूचे बॉक्स आढळले.


गोव्यातून महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या हा मद्यसाठा नेण्यात येत होता.  या कारवाईमुळे दारू तस्करीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून, अबकारी विभागाने ट्रक आणि दारूसाठा ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.



हेही वाचा
सर्व पहा