स्वातंत्र्यदिन सोहळ्यात गोव्याचे डीजीपी आलोक कुमार भोवळ येऊन पडले; प्रकृती स्थिर

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
28 mins ago
स्वातंत्र्यदिन सोहळ्यात गोव्याचे डीजीपी आलोक कुमार भोवळ येऊन पडले; प्रकृती स्थिर

पणजी : गोव्याचे पोलीस महासंचालक (DGP) आलोक कुमार (आयपीएस) हे स्वातंत्र्यदिनानिमित्त पणजीत आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत पारितोषिक वितरण सोहळ्यादरम्यान अचानक भोवळ येऊन खाली कोसळले. या अनपेक्षित घटनेमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, तीव्र उकाडा आणि डिहायड्रेशनमुळे त्यांना भोवळ आल्याचे स्पष्ट झाले आहे.



वैद्यकीय पथकाची तात्काळ धाव

घडलेला प्रकार लक्षात येताच सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने क्षणाचाही विलंब न करता त्यांच्याकडे धाव घेतली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देखील मदतीसाठी पुढे सरसावले प्राथमिक प्रथमोपचार दिल्यानंतर डीजीपी आलोक कुमार यांना तातडीने रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 




प्रकृतीत सुधारणा

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ आवश्यक ते उपचार सुरू केले. पोलीस दल आणि प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजीपी आलोक कुमार यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून त्यांची तब्येत धोक्याबाहेर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या व नियमित निरीक्षण (Routine Observation) केले जात आहे.


हेही वाचा
सर्व पहा