बेळगावातील धबधब्यावर गोमंतकीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

युवक पेडे-म्हापसा येथील रहिवासी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
बेळगावातील धबधब्यावर गोमंतकीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

पणजी : बेळगाव जिल्ह्यातील एका धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या गोव्यातील युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी घडली.

मृत युवकाचे नाव सुमित ताळगावकर (रा. पेडे, म्हापसा) असे आहे. धबधब्यावर पोहण्यासाठी किंवा पाण्यात उतरल्यानंतर तो खोल पाण्यात गेल्याने बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शोध मोहीम राबवून सुमित याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

धबधबे, जलाशय परिसरात खबरदारी घेण्याचे आवाहन 

दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास संबंधित पोलिसांकडून सुरू आहे.  नागरिकांनी पावसाळ्यात धबधबे व जलाशय परिसरात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा