तिसऱ्या वडे

Story: चमचमीत रविवार |
01st August, 11:14 pm
तिसऱ्या  वडे

साहित्य :  १ वाटी सोललेल्या, धुतलेल्या तिसऱ्या,  १-२ चमचे तांदळाचे पीठ,  २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून,  अर्धा इंच आलं बारीक चिरून,  पाव वाटी कांदा बारीक चिरून,  मीठ चवीनुसार,  पाव वाटी बारीक रवा,  तेल तळण्यासाठी.

वाटणासाठी - अर्धी वाटी खवलेला नारळ, २ चमचे सांबार मसाला किंवा मेतकूट,  अर्धा चमचा लाल तिखट,  पाव चमचा हळद,  अर्धा चमचा चिंचेचा कोळ,  मीठ

कृती -  तिसऱ्यातील जास्तीचे पाणी पिळून काढा, मात्र त्या कोरड्या होणार नाहीत याची काळजी घ्या. वाटणाचे सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरवर चांगले वाटून घ्या. त्यात तांदळाचे पीठ टाकून पुन्हा फिरवून घ्या. तिसऱ्या या वाटणात घोळवून घ्या आणि एका भांड्यात काढून घ्या. त्यात कांदा, आलं, मिरची घालून एकत्र करून घ्या. या मिश्रणाचे एका इंचाचे गोळे करून हातावर वड्याचा आकार देऊन घ्या आणि ख्यात घोळवा. सर्व पिठाचे वडे करून एका ताटलीत काढून घ्या. आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये एक इंच तेल पसरवा. तेल तापले की त्यात वडे सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळा. वडे अधिक तिखट हवे असल्यास पिठात लाल तिखट आणि थोडे मीठ घाला.


- शिल्पा रामचंद्र, मांद्रे