Home >> देश -परदेश >> इंदूरमध्ये सामोसे-कचोरीसाठी ट्रेन थांबवली?

इंदूरमध्ये सामोसे-कचोरीसाठी ट्रेन थांबवली?

व्हायरल व्हिडीओत दावा; पश्च‌िम रेल्वे अधिकारी म्हणतात..

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
8 hours ago
इंदूरमध्ये सामोसे-कचोरीसाठी ट्रेन थांबवली?

 इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर येथे लोको पायलटने सामोसे आणि कचोरी खरेदी करण्यासाठी मालगाडी थांबवल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (Loco pilot stopped train to buy samosas and kachoris in Indore?). मात्र, पश्चिम रेल्वेने हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये निळ्या गणवेशातील सहाय्यक लोको पायलट (ALP) रेल्वे रुळालगतच्या दुकानातून सामोसे आणि कचोरी खरेदी करताना दिसतो. त्यानंतर तो पुन्हा इंजिनमध्ये चढताना दिसत असल्याने, "लोको पायलटने खाण्यासाठी ट्रेन थांबवली," असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला.

मात्र, रतलाम विभाग आणि पश्चिम रेल्वेने या दाव्याचे खंडन करताना सांगितले की, रेल्वेगाडी संबंधित मालगाडी राऊ (RAU) यार्ड परिसरात सुरू असलेल्या नियोजित अभियांत्रिकी (Engineering) कामामुळे होम सिग्नलवर आधीपासूनच थांबवण्यात आली होती.

रेल्वेच्या माहितीनुसार, अधिकृत थांब्यादरम्यान सहाय्यक लोको पायलटने वैयक्तिकरित्या सामोसे आणि कचोरी खरेदी केले.  ट्रेन सामोसे, कचोरीसाठी थांबवण्यात आली नव्हती. या घटनेचा चुकीचा अर्थ लावून आणि संपादीत व्हिडिओद्वारे दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यात आली, असे रेल्वेने स्पष्ट केले. सोशल मीडियावर कोणतीही माहिती किंवा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी त्याची अधिकृत स्रोतांकडून पडताळणी करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेने नागरिकांना केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा