
मडगाव : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
गाडीचे वेळापत्रक
मुंबई सीएसएमटी ते करमळी (गाडी क्रमांक ०११२९):
ही ट्रेन शुक्रवार, २६ जून रोजी मध्यरात्री ००:२० वाजता मुंबई सीएसएमटी येथून सुटणार असून त्याच दिवशी दुपारी १४:४० वाजता करमळी येथे पोहोचेल.
करमळी ते मुंबई सीएसएमटी (गाडी क्रमांक ०११३० - परतीचा प्रवास):
ही परतीची ट्रेन रविवार, २८ जून रोजी सायंकाळी १६:३० वाजता करमळी येथून सुटणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:२५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.
ही २० डब्यांची विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी या स्थानकांवर थांबेल. गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.