गोव्यात २४ तासांत ५ दुर्दैवी घटना;८ जणांनी गमावला जीव

काल शनिवारी ६ तर आज रविवारी दोघांचा मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
53 mins ago
गोव्यात २४ तासांत ५ दुर्दैवी घटना;८ जणांनी गमावला जीव

पणजी  : गोव्यात गेल्या २४ तासांत घडलेल्या पाच वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये सुमारे ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर एका महिलेने मांडवी पूलावरून आत्महत्येचा प्रयत्न केला. आज रविवारी सकाळी पोलिसांचे 'रोबर्ट' वाहन अनमोड भागात गस्त (पेट्रोलिंग) घालत असताना त्यांना दरीत ट्रक कोसळल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने खाली जाऊन पाहिले असता चालक मृतावस्थेत आढळून आला. सुदीप कापोज (रा. पश्चिम बंगाल) असे या मृत चालकाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात शनिवारी (१३ जून) रात्री उशिरा घडला असावा. या घटनेची माहिती मिळताच कुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा रीतसर पंचनामा केला.




तर दूसरा अपघात आज पहाटे कळंगुट परिसरात घडला. सावतावाडा, बागा येथे कार-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार केतन गावडे (२५, कुंभारजुवे) या टुरिस्ट पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. फरार कोल्हापूरस्थित कार चालकाचा कळंगुट पोलिसांकडून शोध सुरू आहे.




दरम्यान तिसराअपघात आज धारबांदोडा येथे घडला. दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण धडकेत ६९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला आहे. विजय चव्हाण (वय ६९, रा. पणसुले-धारबांदोडा) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघातासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जुने गोवे येथील डोंगरी भागातील १० ते १२ तरुणांचा एक गट रविवारच्या सुट्टीनिमित्त बाईक राईडवर निघाला होता. त्याच वेळी स्थानिक रहिवासी विजय चव्हाण हे आपल्या दुचाकीवरून पेट्रोल पंपाच्या दिशेने जात होते. वाटेत एके ठिकाणी दोन्ही दुचाकींची परस्परांना जोरदार धडक बसली. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.




काल शनिवारी घडलेले अपघात.

कुळे येथे शनिवारची सुट्टी साजरी करण्यासाठी आलेल्या ५ जणांच्या गटांवर संकट ओढवले. दूधसागर नदीपात्रात पोहण्यास उतरलेल्या चार तरुणांचा मृत्यू झाला यात तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे. दरम्यान काल सायंकाळी, कोलवाळ येथे पुलावर रस्ता क्रॉस करत असताना चारचाकीची धडक बसून कोलवाळचे माजी पंच ठार झाले. तर रात्री उशिरा जुन्या मांडवी पूलावरून नदीत उडी मारून एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अद्याप तिचा मृतदेह सापडलेला नाही. तपास सुरू आहे. 




बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा