वाढत्या वीज बिलांचा ‘पेज’ जेवून निषेध!

हणजूण ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
34 mins ago
वाढत्या वीज बिलांचा ‘पेज’ जेवून निषेध!

पणजी : स्मार्ट मिटरमुळे (Smart Meter)  वाढवून येणारी विजबिले सामान्य लोकांना पेज जेवण्याची पाळी आणणार, असे म्हणत हणजूण ग्रामस्थांनी पणजी विद्युत भवनच्या इमारतीत पेज जेवून वाढत्या वीज बिलांचा निषेध केला. यावेळी आपचे आजी- माजी अध्यक्ष व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. 

या महिन्यात हणजूण भागातील वीज ग्राहकांना नेहमीपेक्षा तिप्पट अधिक बिले आली आहेत. मंजुरीपेक्षा अतिरिक्त भार वापरल्याबद्दल ग्राहकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र असे करण्यापूर्वी याविषयी जागृती करणे आवश्यक होते. यामुळे खात्याने दंड माफ करून उर्वरित बिल भरण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी द्यावा अशी मागणी गजानन तिळवे यांनी केली. गुरुवारी त्यांनी मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी अमित पालेकर, वाल्मिकी नाईक यांच्यासह हणजूणचे ग्रामस्थ उपस्थित होते. 

नियमानुसारच दंड 

स्टीफन फर्नांडिस यांनी सांगितले की, अतिरिक्त भार वापरल्याबद्दल होणाऱ्या दंडाबाबत वीज खात्याने यापूर्वी जागृती केली आहे. आम्ही दंडाची रक्कम जेईआरसी आणि वीज कायद्यानुसार ठरवली आहे. तरीही ग्रामस्थांची मागणी आम्ही सरकार पर्यंत पोहोचवणार आहोत.

हेही वाचा