स्व. पर्रीकरांचे कार्य देशवासियांना प्रेरणा देत राहणार : रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा

स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर केले प्रतिपादन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
6 hours ago
स्व. पर्रीकरांचे कार्य देशवासियांना प्रेरणा देत राहणार : रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा

पणजी : स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी मुख्यमंत्री म्हणून गोव्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. भाजपच्या सुशासनाला बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. यादरम्यान पर्रीकर यांनी संरक्षण मंत्री म्हणून संरक्षण क्षेत्राला मजबूत बनवण्यासाठी त्यांनी काम केले.   त्यांचे काम आमच्यासह देशातील सर्व नागरिकांना प्रेरणा देत राहील; असे प्रतिपादन रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी केले. 

गुरुवारी त्यांनी मिरामार येथे पर्रीकर यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. व्ही सोमण्णा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) बारा वर्षांच्या कालावधीत देशात प्रगती झाली आहे.

यूपीए काळात किंवा त्याआधी पन्नास वर्षे देशात जी कामे होऊ शकली नाहीत, ती मोदींच्या कार्यकाळात झाली आहेत. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य, जिल्हा विकसित झाले पाहिजे. यासाठी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. 

भाजप सरकार प्रत्येक राज्यात विकास कामे करत आहे. चांगले प्रशासन कसे असते हे मोदींनी दाखवून दिले आहे. गोवा जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. येथे पर्यटन तसेच अन्य क्षेत्रात विकास कामे करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत.

मोदींच्या दूरदर्शीपणामुळे आणि डबल इंजिन सरकारमुळे विकासाची गती वाढली आहे. गोवा याचे उत्तम उदाहरण आहे. भाजप काळातच कोट्यवधी लोक दारिद्र्यातून बाहेर पडले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे आशीर्वाद तसेच मोदींच्या कर्तृत्वामुळे आपल्या देशाचे भवितव्य उज्वल असल्याचे व्ही सोमण्णा यांनी सांगितले.

केंद्र सरकार प्रत्येक राज्याचे हित जपेल

व्ही. सोमण्णा म्हणाले की, प्रत्येक राज्याला आपले हित पाहण्याचा अधिकार आहे. कोणतेही राज्य आपल्या जनतेसाठी योग्य असेल ते काम करत आहे. म्हादईबाबत चर्चा सुरू आहे. यातील तांत्रिक गोष्टी मला माहिती नाहीत. केंद्र सरकार सर्व राज्यांचे हित जपेल अशी खात्री मला आहे.

हेही वाचा