दोन युवकांच्या अपहरण, मारहाणप्रकरणी आणखी तिघांना अटक

यापूर्वी केली होती दोघांना अटक; करंझाळे येथून केले होते अपहरण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
दोन युवकांच्या अपहरण, मारहाणप्रकरणी आणखी तिघांना अटक

पणजी : करंझाळे येथील समुद्रकिनाऱ्यावरून एका तरुणाचेव त्याच्या मित्राचे अपहरणकरून जबर मारहाण केल्याप्रकरणीपोलिसांनी फरार असलेला मुख्यसंशयित आकाश मुद्रस (बांबोळी),जावेद बल्लारी (करंझाळे)आणि कल्पेश (रायबंदर)या तिघांना अटक केलीआहे. यापूर्वीपोलिसांनी याप्रकरणी शोएबबेग व झाकीउल्ला काझी (करंझाळे)या दोघांना अटक केलीहोती.

गेल्याआठवड्यात घडलेल्या याप्रकरणीताळगाव येथील आयाज फराश यांनीतक्रार दिली होती. त्यानुसारआयाज आणि त्यांचा मित्र उस्मानहे दोघे ३ जून रोजी करंझाळेयेथील समुद्र किनाऱ्यावरबसले होते. त्यावेळीपाच संशयितांनी तिथे येऊनत्यांना चाकू व काचेच्याबाटल्यांचा धाक दाखवून जीवेमारण्याची धमकी देत कारमध्येकोंबून आगशीच्या दिशेने नेले.

संशय‌ितांनी दोघाहीतरुणांना बांबोळी आणि शिरदोनयेथील निर्जन स्थळी डांबूनठेवून नंतर लाथाबुक्क्यांनी,बेल्टने, लाकडीदांडके आणि प्लास्टिकच्यापाईपने अत्यंत निर्घृणपणेबेदम मारहाण केली होती.नंतर संशयितांनीत्यांचे मोबाईल फोन, सोन्याचीकर्णफुले (कानातीलदागिने) हिसकावूनघेतले.

आणि जीवेमारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडूनजबरदस्तीने ४० हजार रुपयेउकळल्याचे तक्रारीत नमूदकेले होते. याप्रकरणीपोलिसांनी आता पाचही जणांनाअटक केली असून, पणजीपोलीस (Panjim Police) पुढीलतपास करीत आहेत.  

हेही वाचा