Home >> गोवा >> केरळच्या २८ पर्यटकांना अन्नातून विषबाधा; उपचारानंतर डिस्चार्ज

केरळच्या २८ पर्यटकांना अन्नातून विषबाधा; उपचारानंतर डिस्चार्ज

जुने गोवे येथे जेवल्यानंतर पर्यटकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला होता.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
10th June, 03:06 pm
केरळच्या २८ पर्यटकांना अन्नातून विषबाधा; उपचारानंतर डिस्चार्ज

मडगाव : गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या एका गटाला अन्नातून विषबाधा (फूड पॉइझनिंग) झाल्यामुळे दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर सर्वांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



ही घटना ९ जून रोजी रात्री उशिरा घडली. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पर्यटक दोन बसमधून प्रवास करत होते. त्यांनी जुने गोवे येथे जेवण केले होते. त्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात केली असता, रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. रात्री दीड वाजेपर्यंत रुग्णांना दाखल करून घेण्याचे काम सुरू होते.


Food poisoning — Science Learning Hub


उपचार घेतलेल्या २८ पैकी २५ पर्यटकांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना तातडीने डिस्चार्ज देण्यात आला. उर्वरित दोन महिला आणि एका मुलाला डॉक्टरांनी देखरेखीखाली राहण्याचा सल्ला दिला होता; मात्र दुसऱ्या राज्यात जावे लागणार असल्याने त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर (LAMA) रात्री अडीच वाजता डिस्चार्ज घेतला. कोणत्याही पर्यटकाची प्रकृती चिंताजनक नव्हती, असे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


हेही वाचा
सर्व पहा