बांबोळी येथे कार- दुचाकीच्या भीषण अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

चुकीच्या दिशेने दुचाकी चालवल्याने घडला अपघात

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
14 mins ago
बांबोळी येथे कार- दुचाकीच्या भीषण अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

पणजी :बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमजवळ राष्ट्रीयमहामार्गावर सोमवारी पहाटेकार आणि दुचाकी अपघात झाला.यात दुचाकी चालकसाल्वादोर फर्नांडिस (८०वर्षे, साल्वादोरद मूंद - पर्वरी) आणि दुचाकीवर मागेबसलेली पाऊलिना फर्नांडिस(७५ वर्षे) यादाम्पत्याचे निधन झाले.या प्रकरणी आगशीपोलिसांनी अपघाती मृत्यूदाखल करून कारवाई सुरू केलीआहे.


आगशीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी पहाटे ४.३०वाजता बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमजवळ राष्ट्रीयमहामार्गावर कार आणि दुचाकीचाअपघात झाल्याची माहिती मिळाली.त्यानुसार, पोलीसनिरीक्षक अनंत गावकर यांच्यामार्गदर्शनाखाली साहाय्यकउपनिरीक्षक उल्हास गावकरयांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यावेळी कार चालकपणजीहून मडगावच्या दिशेनेजात होता.



याच दरम्यानवरील ठिकाणी पोहोचताच समोरूनदुचाकी आली. त्यावेळीअचानक दुचाकी समोरून आल्यामुळेकारची दुचाकीला धडक बसली.त्यात दुचाकीवरीलसाल्वादोर फर्नांडिस आणिमागे बसलेली पाऊलिना फर्नांडिसया दोघांना गंभीर दुखापत झाली.त्या दोघांना बांबोळीयेथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयइस्पितळात नेण्यात आले.तिथे उपचार सुरू असतानात्या दोघांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनीअधिक चौकशी केली असता, दुचाकीचालक पर्वरीहून गोवा वैद्यकीयमहाविद्यालय इस्पितळातजाण्यासाठी आला होता.त्यावेळी तो रस्ताचुकला. त्यामुळेत्यांनी चुकीच्या दिशेने परतमाघारी घेतली. त्याचवेळी कार आणि दुचाकीची समोरासमोरधडक बसल्याची माहिती समोरआली आहे.

या प्रकरणीआगशी पोलिसांनी प्रथमदर्शनीमाहितीच्या आधारे अपघाताचीनोंद करून तपास सुरू केला आहे.याप्रकरणी महिलाउपनिरीक्षक दिपिका परमारपुढील तपास करत आहेत.

गतवर्षी२७३ जणांचे मृत्यू

दरम्यान,गोव्यात अपघात वाढतअसून, नियमांचेपालन न करता व निष्काळजपीपणेवाहने चालवल्याने अपघात वाढतअसल्याचे वाहतूक पोलिसांचीआकडेवारी दर्शवत आहे. गेल्यावर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर,२०२५ दरम्यान, ,३७०अपघात घडले. त्यात२७३ जणांचे मृत्यू झाले.त्यातील ४०.६५टक्के म्हणजे १११ जणांना हेल्मेट, सीटबेल्टन वापरल्याने प्राणास मुकावेलागल्याचे ही आकडेवारी दर्शवतआहे.

वाहनेहाकताना घरी कुटुंबीय वाटपाहतात याची जाणिव ठेवावी

यापार्श्वभूमीवर वाहन चालकांनीनियमांचे पालन करून वाहनेहाकावीत. घरी आपलेकुटुंबीय वाट पाहत आहे,याची जाणिव ठेवूनवाहने हाकावीत व स्वत: बरोबरचइतरांच्याही जीवाची खबरदारीघ्यावी, असे भावनीकआवाहन वाहतूक पोलिसांनी केलेआहे.  

हेही वाचा