इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत तणाव शिगेला

इस्त्रायली हल्ल्यानंतर इराणची प्रत्युत्तरात्मक कारवाई

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत तणाव शिगेला

तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला असून, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रांची दुसरी फेरी डागल्याचा दावा करण्यात आला आहे. इस्रायली लष्कराने देशभरात सायरन वाजल्याची माहिती दिली असून; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याआधी इस्रायलने इराणमधील तेहरान, तब्रीझ आणि इस्फहान परिसरात हल्ले केल्याचे वृत्त समोर आले असून, अनेक भागांत स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यांनंतर इराणने प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केल्याचे मानले जात आहे.

 इस्रायच्या  हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू; २० जण जखमी 

दरम्यान, रविवारी इस्रायलने बैरूतच्या दक्षिण उपनगरांवर हल्ला केल्याने किमान दोन जणांचा मृत्यू झाला तर सुमारे २० जण जखमी झाले. या घटनेनंतर इराणने उत्तरेकडील इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. इराणने इस्रायलवर युद्धविराम करारांचे वारंवार उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे इस्त्रायलला संयम बाळगण्याचे आवाहन 

या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून संयम बाळगण्याचे आवाहन केल्याचे वृत्त आहे.  मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा