
पणजी : हडफडे येथे आयोजित करण्यात आलेल्या एका इव्हेंटदरम्यान दुर्दैवी घटना घडली असून, विजेचा धक्का लागल्याने कर्नाटकातील युवकाचा मृत्यू झाला. अनिकेत पाटील (रा. कर्नाटक) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इव्हेंटस्थळी असताना अनिकेत पाटील यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे इव्हेंटस्थळी एकच खळबळ उडाली असून; उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. विजेचा धक्का नेमका कशामुळे लागला, याचा तपास सुरू असून पुढील चौकशी करण्यात येत आहे.