इंधन दरवाढीमुळे जेसीबीच्या भाडेदरात वाढ करण्याचा निर्णय

जेसीबी मालकांची वास्कोत बैठक : स्पेअरपार्ट्सच्या दरातही वाढ


27 mins ago
इंधन दरवाढीमुळे जेसीबीच्या भाडेदरात वाढ करण्याचा निर्णय

माहिती देताना जेसीबी मालक दामोदर नाईक व इतर.
....
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : इंधन दरवाढीमुळे जेसीबी मालकांसमोर काही समस्या निर्माण झाल्याने जेसीबी भाडेदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय येथील जेसीबी मालकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
जेसीबीमालक दामोदर नाईक यांनी इंधन दरवाढीमुळे जेसीबीमालकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे यासंबंधी माहिती दिली. ते म्हणाले, डिझेलच्या दरामध्ये वाढ झालीच आहे. जेसीबीसाठी लागणारे वंगण, तेल, ग्रीस, हायड्रॉलिक पार्ट्स, सुटे भाग यांच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. जेसीबी ऑपरेटरच्या वेतनात झालेल्या वाढीमुळे आमच्यासमोर काही आर्थिक प्रश्न उभे राहिले आहेत. एकंदर समस्यांचा विचार करून आम्ही जेसीबी भाडेदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
जेसीबीचे बदललेले भाडेदर
पूर्वी आम्ही जेसीबी बकेटसाठी एक हजार रुपये प्रति तास घेत होतो. आता तो दर १३०० करण्यात आला आहे. जेसीबी ब्रेकरसाठी आम्ही पूर्वी १२०० रुपये प्रति तास घेत होतो. आता त्यामध्ये ३०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ज्यांना महिन्यासाठी जेसीबी भाड्याने घ्यावयाचा असेल त्यांना जेसीबी बकेटसाठी १ लाख २० हजार रुपये, तर ब्रेकरसाठी दीड लाख रुपये भाडे द्यावे लागेल. जेसीबी कामांसाठी किमान चार तासांचे बिलिंग अनिवार्य आहे, असे दामोदर नाईक यांनी स्पष्ट केले.       

हेही वाचा