डॉ. केतन भाटीकर यांनी निस्वार्थपणे सामाजिक कार्य केले : रितेश नाईक

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
38 mins ago
डॉ. केतन भाटीकर यांनी निस्वार्थपणे सामाजिक कार्य केले : रितेश नाईक

पणजी : डॉ. केतन भाटीकर यांनी निस्वार्थपणे सामाजिक कार्य केले. कोविड काळात त्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांची उणिव निश्चितपणे जाणवेल, असे स्व. रवी नाईक यांचे सुपूत्र रितेश नाईक यांनी म्हटले आहे.

फोंडा पोटनिवडणुकीतील (Ponda assembly by election)  भाजपचे उमेदवार रितेश नाईक (Ritesh Ravi Naik)  यांनी सुद्धा डॉ. केतन भाटीकर (Dr. Ketan Bhatikar)  यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनामुळे बसलेला धक्का पचवण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

फोंड्यातील आयडी हॉस्पिटलाचा दर्जा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे निश्चितपणे प्रयत्न करतील. आयडी हॉस्पिटलात अधिकाधिक सुविधा निर्माण व्हाव्या, अशी डॉ. भाटीकर यांची इच्छा होती. रद्द झालेल्या फोंडा पोटनिवडणुकीत रितेश नाईक हे भाजपचे तर डॉ. केतन भाटीकर हे काँग्रेसचे उमेदवार होते.

हेही वाचा