गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात ३७ पदांसाठी भरती

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
4 hours ago
गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात ३७ पदांसाठी भरती

पणजीः गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात (Goa College of Engineering)  विविध विभागात सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी ३७ पदे जाहीर करण्यात आली आहेत. ही सर्व पदे कंत्राटी आणि अतिथी तत्त्वावर थेट मुलाखती घेऊन भरण्यात येणार आहेत. कंत्राटाचा कालावधी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ३ शैक्षणिक (Education)  सत्रांसाठी असणार आहे. नंतर ही पदे नियमित तत्वावर भरण्यासाठी प्रथम येणाऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे. 

फार्मागुडी-फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रकाशीत केलेल्या जाहीरातीनुसार विज्ञान आणि मानविकी (गणित, रसायनशास्त्र) विभागात ३ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही सर्व पदे आरक्ष‌ित नसून; यासाठी २३ मे ला थेट मुलाखती होणार. 

माहिती ‌तंत्रज्ञान (Information Technology)  विभागात ६ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यातील ३ अनारक्षित, १ ओबीसी, १ पीडब्ल्युडी आणि १ एसटीसाठी आरक्षित आहे. कंप्युटर अभियांत्रिकी विभागात ४ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यातील २ अनारक्षित आणि २ ओबीसीसाठी राखीत आहेत. या दोन्ही विभागांसाठी थेट मुलाखत २५ मे रोजी होणार आहे. 

इलेक्ट्रॉनिक्स आणि टॅलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी, व्हीएलएसआय विभागात १० पदे जाहीर झाली आहेत. त्यातील ८ अनारक्षित आणि २ ओबीसीसाठी राखीव आहेत. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागात ४ पदे जाहीर झाली आहेत. त्यातील ३ अनारक्षित आणि १ ओबीसीसाठी राखीव आहे. या दोन्ही विभागांसाठी थेट मुलाखती २६ मे रोजी होणार. 

सि‌व्ह‌िल अभियांत्रिकी विभागात पाच पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यातील ३ पदे अनारक्षित आणि प्रत्येकी एक पद ओबीसी आणि एसटीसाठी राखीव आहेत. मॅकॅनीकल अभियांत्रिकी विभागात पाच पदे जाहीर झाली आहेत. त्यातील २ अनारक्ष‌ित, २ ओबीसी आणि १ एसटीसाठी राखीव आहे. या दोन्ही विभागांसाठी थेट मुलाखती २७ मे रोजी होणार. 

उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी सकाळी ९.३० वाजता वर नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व संबंधीत कागदपत्रे, प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती आणि प्रमाणीत प्रती तसेच १ पासपोर्ट आकाराचा फोटो घेऊन उपस्थित रहावे. वेतन आणि वर्ष मर्यादा गोवा सरकारच्या लागू असलेल्या नियमांप्रमाणे असणार आहे. 


हेही वाचा