गोव्याच्या ट्रिपपेक्षा विमानातील ड्रामाच ठरला चर्चेचा विषय; एअर होस्टेसही पडली पेचात!

म्हणतात ना, चोरी आणि प्रेम कधीच लपून राहत नाही! जीवाचा गोवा करण्यासाठी निघालेल्या एका तरुणाच्या बाबतीत नेमका हाच प्रत्यय आला. पण ही पोलखोल झाली थेट विमानात, तेही प्रवाशांनी भरलेल्या फ्लाईटमध्ये. एका गर्लफ्रेंडसोबत गोव्याच्या ट्रिपचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या या तरुणाला स्वप्नातही वाटले नसेल की, त्याचे इतर दोन 'सीक्रेट' अफेअर्सही त्याच विमानात समोर येतील.
विमानाचे टेकऑफ होण्यापूर्वीच ही घटना घडली. त्या तरुणाच्या सीटवर जेव्हा एकामागोएक त्याच्या तीन गर्लफ्रेंड्स समोरासमोर आल्या, तेव्हा विमानातील शांतता पूर्णपणे भंग पावली. एका पार्टनरला सोडून दुसऱ्या आणि तिसरीलाही त्याने अशाच प्रकारे डेट केल्याचे समोर येताच विमानात 'हायव्होल्टेज ड्रामा' रंगला. जोरदार आरडाओरडा, शाब्दिक चकमक आणि हमरीतुमरी यामुळे प्रवाशांनाही नक्की काय घडतंय हे कळेनासे झाले.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरतोय. नेटिझन्स यावर मजेशीर कमेंट्स करत असून काहींनी याला गोव्याच्या ट्रिपचा सर्वात मोठा बोनस म्हटले आहे. काहींनी अशा कॅसानोव्हाला असाच धडा मिळायला हवा, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक एकजण म्हणाला 'एका म्यानात तीन तलवारी राहुच शकत नाहीत. एकूणच, हा तरुण गोव्याला पोहोचण्यापूर्वीच सोशल मीडियावर चांगलाच 'फेमस' झाला आहे.
( सदर व्हिडिओ हा स्क्रिप्टेड असून, फ्लाईट अकॅडेमीच्या ट्रेनिंग सेशन दरम्यान प्रवाशांना कसे हाताळायचे याबाबत हे प्रात्यक्षिक आहे.)