निवृत्त आयपीएस अधिकारी रामासुब्रमणी यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

चेन्नई : तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून नवा घटनात्मक वाद निर्माण झाला असून निवृत्त आयपीएस अधिकारी एम. रामासुब्रमणी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका (petition in the Supreme Court) दाखल केली आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके TVK) पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय (C. Joseph Vijay) यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण न देण्याच्या राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर (Governor Rajendra Vishwanath Arlekar) यांच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिले आहे.
याचिकेत म्हटले आहे की, सर्वात मोठा पक्ष असूनही टीव्हीकेला सरकार स्थापनेसाठी संधी न देणे हे लोकशाही परंपरा आणि घटनात्मक तत्त्वांच्या विरोधात आहे. तसेच बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेबाहेर पाठिंबा मिळवण्याची अट घालण्यात आली आहे. ती घटनाबाह्य असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
राज्यपालांच्या निर्णयामुळे तमिळनाडूतील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर काय भूमिका घेते, यावर राज्यातील पुढील सत्तासमीकरण अवलंबून राहणार आहे.