सुवेंदू बनले पश्चिम बंगालचे अधिकारी; पंतप्रधानांच्या उपस्थितीत घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

पाच आमदारांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
सुवेंदू बनले पश्चिम बंगालचे अधिकारी; पंतप्रधानांच्या उपस्थितीत घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणातील ऐतिहासिक घडामोडीत सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी शनिवारी पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत मंत्र‌िमंडळातील पाच आमदारांनीही  मंत्री पदाची शपथ घेतली. कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), भाजपचे (BJP)  वरिष्ठ नेते तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांच्यासहीत अनेक नेते, भाजप शासीत राज्याचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित होते. 


पाच आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राज्यपाल आर. एन. रवी (R. N. Ravi) यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासह नव्या मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भाजपच्या नव्या सरकारमध्ये तुर्तास दिलीप घोष (Dilip Ghosh), अग्न‌िमित्रा पॉल (Agnimitra Paul), अशोक कीर्तनिया (Ashok Kirtania), खुदीराम टुडू (Khudiram Tudu),  निसिथ प्रामाणिक (Nisith Pramanik)  या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.


२९३ पैकी तब्बल २०७ जागा

अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २९३ पैकी तब्बल २०७ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह तृणमूल काँग्रेसची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली असून मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)  यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

दोन मतदारसंघांत विजय

५७ वर्षीय सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवला. भवानीपूरमध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांचा १५,११५ मतांनी पराभव केला. निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. 

पश्चिम बंगालात नव्या पर्वाची सुरूवात 

भाजपच्या या विजयामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरूवात झाल्याचे मानले जात आहे.


हेही वाचा