सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीपूर्वी कोलकात्यात पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो

भाजप कायकर्ते, समर्थकांचा उत्साह शिगेला

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीपूर्वी कोलकात्यात पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal)  सत्तांतरानंतर राजकीय वातावरण तापले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यात भव्य रोड शो (Road show of Prime Minister Narendra Modi In Kolkata) करून भाजपची ताकद दाखवून दिली. भाजपचे (BJP)  मुख्यमंत्रीपदाचे चेहरे सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari)  यांच्या शपथविधी समारंभाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या रोड शोला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.


कोलकात्यातील प्रमुख मार्गांवर भगवे झेंडे, फलक आणि घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. पंतप्रधान मोदी यांनी खुल्या वाहनातून नागरिकांचे अभिवादन स्वीकारले. रोड शोदरम्यान सुरक्षा व्यवस्थेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


भाजपच्या ऐतिहासिक विजयामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा बदल घडल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीपूर्वी झालेला हा रोड शो भाजपकडून आगामी राजकीय दिशा आणि जनसमर्थनाचे प्रदर्शन मानले जात आहे.

हेही वाचा