आंदोलन करणाऱ्या कारापूरच्या मुंडकारांना कागदपत्रे सादर केल्यास मिळणार हक्क

पणजी : आंदोलन करणाऱ्या कारापूर- सर्वणच्या (karapur-Sarvan) ग्रामस्थांनी कूळ वा मुंडकार (Tenancy claims) जागेविषयी जी काही कागदपत्रे आहेत, ती त्यांनी मामलेदारांकडे सादर करावीत. कागदपत्रांच्या आधारावर आवश्यक तो लाभ किंवा हक्क मुंडकारांना मिळणार, असे मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. लोढाच्या प्रकल्पाविषयी संबंधीत खाती विचार करणार, असे त्यांनी सांगितले.
लोढाच्या प्रकल्पाविषयी (Lodha Project) मात्र मुख्यमंत्र्यांनी ठोस असे आश्वासन दिले नाही. कारापूर- सर्वणच्या ग्रामस्थांनी अजूनपर्यंत कसलीच कागदपत्रे मामलेदारांकडे सादर केली नाहीत. त्यामुळे त्यांच्या हक्कांविषयी अजूनपर्यंत कसलाच निर्णय झाला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कारापूर – सर्वणचे ग्रामस्थ गेले कित्येक दिवस पंचायती पुढे धरणे आंदोलन करीत आहेत. पंचायत क्षेत्रात लोढाच्या गृहनिर्माण प्रकल्पाला त्यांचा विरोध आहे. हा प्रकल्प रद्द करावा; अशी त्यांची मागणी आहे. आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा केली. चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ग्रामस्थांना कूळ वा मुंडकार विषयीची कागदपत्रे सादर करण्यास मी सांगितले आहे; असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.