
सांगे : येथील साळावली धरणात (Sanguem Salaulim Dam) सध्या एप्रिल अखेरीस असलेला पाण्याचा साठा पुढील दोन महिने शेती, पिण्यासाठी व वापरण्यासाठी पुरेसा आहे.
पाऊस पडला तर पाण्याची पातळी आणखी वाढणार असल्याचे जलस्त्रोत खात्याचे (Water resource department) सहाय्यक अभियंता रेगन डिसोझा यांनी सांगितले. सध्याची पाण्याची पातळी ३३.६८ मीटर, कमाल पाणी पातळी ४१.१५ मीटर, सध्याचा साठा १०२ मिलीयन क्यूबिक मीटर तर एकूण क्षमता २३४३६ हेक्टर मीटर अशी आहे. धरण सध्या साधारण ४३.५ टक्के भरलेले आहे.
गेल्या वर्षी या तारखेला ४७.२५ टक्के भरलेले होते. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी कमी साठा असल्याने वेळेवर पाऊस पडला नाही तर पाण्याची टंचाई होऊ शकते. पण सध्या तरी पाणी पाहिल्यास चिंता करण्याचे कारण नसल्याचे डिसोझा यांनी सांगितले.