गोव्यातील बेती येथे बनावट ‘कॉल सेंटर’मधून अमेरिकेच्या नागरिकांची ६ लाखांची फसवणूक

साळगाव पोलिसांची धाड; ९ जणांना अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
48 mins ago
गोव्यातील बेती येथे बनावट ‘कॉल सेंटर’मधून अमेरिकेच्या नागरिकांची ६ लाखांची फसवणूक

पणजी : गोव्यातील (Goa) बेती, वेरे, बार्देश येथे बनावट ‘कॉल सेंटर’ (Fake call center)  सुरू करून अमेरिकेतील (USA Citizens)  नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणारे एक रॅकेट साळगाव पोलिसांनी (Goa Police)  उघडकीस आणले. पोलिसांनी बेती येथील जॉयस पॅलेस येथे  टाकलेल्या धाडीत ९ जणांना अटक केली आहे.  त्यात गुजरात, महाराष्ट्र, पश्च‌िम बंगाल, नागालॅंड येथील संशयितांचा समावेश आहे. अमेरिकेतील नागरिकांची सहा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे  उघडकीस आले आहे.

अटक करण्यात आलेल्यांत संदीपकुमार प्रियदर्शी (अहमदाबाद, गुजरात), आकाश काळे (मुंबई, महाराष्ट्र), कवीश थारीवाला (अहमदाबाद, गुजरात), अक्षय नायर (ठाणे, महाराष्ट्र), हिरेन भयाणी (मालाड, पूर्व, महाराष्ट्र), अजय किशोर दास (कोलकाता, पश्चिम बंगाल), तन्मय पवार (कांदीवली, पूर्व मुंबई), विकीहो सोहे (दिमापुर, नागालॅंड), लहोशेटो रोचील (दिमापुर, नागालॅंड) या युवकांचा समावेश आहे. 

बनावट ‘कॉल सेंटर’ सुरू करून अमेरिकेतील नागरिकांची लॅपटॉप व खाजगी नेटवर्क वापरून सविस्तर माहिती मिळवली. त्यानंतर अमेरिकेतील बॅंकेचे अधिकारी असल्याची बतावणी करून कर्ज देण्याच्या व अॅप्पल सॉफ्टवॅर सहय्यक असल्याच्या बहाण्याने अमेरिकेतील नागरिकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गिफ्ट कार्डद्वारे रक्कम भरण्यास सांगून नंतर ते ती रक्कम भारतीय चलनात काढून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी साळगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक दिनेश गडेकर यांनी तक्रार नोंदवल्यानंतर रितसर गुन्हा नोंदवून ९ जणांना अटक करण्यात आली. 

हेही वाचा