६१.८४ लाखांची ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक; आजरा, महाराष्टू येथून एकाला अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
26 mins ago
६१.८४ लाखांची ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक; आजरा, महाराष्टू येथून एकाला अटक

पणजी : सायबर गुन्हेगारीविरोधात (Cyber criminal) मोठी कारवाई करत गोवा सायबर विभागाने (Goa Cyber cell)  ६१.८४ लाख रुपयांच्या ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital arrest) फसवणूक प्रकरणात एकाला अटक केली आहे. या प्रकरणी आजरा,  महाराष्ट्र (Maharashtra)  येथील दयानंद बाबुराव देवळकर (वय ४८) याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला रितसर अटक करण्यात आली. 

तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.  संशयिताच्या बँक खात्यात तब्बल ६१ लाख रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यवहारांचा संबंध ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या फसवणुकीशी असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 सायबर विभागाने आरोपीकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी चौकशी सुरू ठेवली असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा