
पणजी : कळंगुट (Calangute) येथील परबावाडा परिसरात आंब्याच्या झाडाच्या (Mango Tree) मोठ्या फांद्या कोसळून रायकर कुटुंबियांच्या चार वाहनांचे मोठे नुकसान झाले. या घटनेत सुमारे १० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
घटनेनंतर पिळर्ण अग्निशमन दलाने (Goa Fire station) तत्काळ घटनास्थळी धाव घेत झाड कापून बाजूला केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, सध्या पावसाचा अलर्ट असल्याने; संभाव्य धोका व नुकसान टाळण्यासाठी झाडांखाली वाहने ठेवू नयेत, असे आवाहन अग्निशमन दलातर्फे करण्यात आले आहे.