
पणजी : गोव्यातील (Goa) वागातोर (Vagator) येथे विहिरीत (Well) पडून एका ३७ वर्षीय मणिपुर (Manipur) येथील युवकाचे निधन झाले. कपडे धुत असताना तोल जाऊन संबंधित युवक विहिरीत पडला.
युवक विहिरीत पडल्याची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धावले. मात्र; तोपर्यंत युवक मृत्यू पावला होता. अग्निशमन दलाने मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. यासंदर्भात पुढील तपास पोलीस करीत आहेत.