वास्कोतील वाडे-चाफेरान परिसरात वर्षभरापासून पाणी टंचाई

स्थानिकांनी विचारला सहाय्यक अभियंत्याला जाब

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
46 mins ago
वास्कोतील वाडे-चाफेरान परिसरात वर्षभरापासून पाणी टंचाई

वास्को : वास्कोतील (Vasco)  वाडे-चाफेरान येथे स्थानिकांना वर्षभरापासून पाणी (Water) टंचाईची  समस्या भेडसावत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे स्थानिकांची हालत खराब झाली आहे.  दीर्घकाळापासून सुरू असलेल्या या समस्येमुळे संतप्त नागरिकांनी बायणा (Baina)  येथील पेयजल पुरवठा खात्याच्या सहाय्यक अभियंत्यांना (Assistant Engineer)  जाब विचारला. 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दररोजच्या गरजांसाठी पाण्याची टंचाई भासत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम मंजुरीच्या प्रतीक्षेत

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना आश्वासन दिले असून, लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे.  नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, मंजुरी मिळताच कामाला गती दिली जाईल.

४० घरांना मिळणार दिलासा

ही जलवाहिनी टाकल्यानंतर परिसरातील सुमारे ४० घरांना दिलासा मिळणार आहे. स्थानिकांनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, यासंदर्भात सहाय्यक अभियंत्यांना विचारले असता; येथील स्थानिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर समस्या सुटणार आहे. 

टॅंकरने पाणी पुरवठा पण..

नळाला ज्या‌ठिकाणी पाणीपुरवठा होत नाही. त्याठिकाणी टॅंकरने पुरवठा केला जातो. मात्र, काही वेळा टॅंकरच्या पाण्याच्या पुरवठ्याची मागणी वाढल्यास काहीप्रमाणात अडचण निर्माण होते. मात्र, सर्वांना पाणीपुरवठा केला जात असल्याचे सहाय्यक अभियंत्यांनी सांगितले. 

हेही वाचा