माशे येथे अपघातात श्री मल्ल‌िकार्जुन महाविद्यालयाची अध्यापिका ठार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
32 mins ago
माशे येथे अपघातात श्री मल्ल‌िकार्जुन महाविद्यालयाची अध्यापिका ठार

काणकोण : माशे, काणकोण (Mashem-Canacona)  येथे झालेल्या भीषण अपघातात (Accident)  एका कारची धडक दुचाकीला बसल्याने; सुचिता बांदेकर (२७ वर्षे) या ठार झाल्या. 

धडक एवढी जबरदस्त होती की, दोन्ही वाहनांचा चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच काणकोण पोलिसांनी (Canacona Police)  घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कसा घडला याचा शोध काणकोण पोलीस घेत आहेत. 

दरम्यान, अपघातात अकाली निधन झालेल्या सुचिता बांदेकर या देळे, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयात अध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. कोंकणी विषय विद्यार्थ्यांना शिकवत होत्या. त्यांच्या चटका लावणाऱ्या अपघाती निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्री मल्ल‌िकार्जुन महाविद्यालयाचे व्यवस्थापन, शिक्षक व विद्यार्थ्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. 

युवकांचे बळी चटका लावणारे 

दरम्यान, वाढत्या अपघातात युवकांचे  जाणारे बळी चटका लावणारे ठरत आहेत.  गेल्या काही दिवसांत घडलेल्या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. त्यात प्रामुख्याने युवायुवतींचा समावेश आहे. दोनापावल येथे काल लक्झरी कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात २३ वर्षीय युवतीचा बळी गेला होता.