बनावट एनओसी प्रकरण

पणजी : ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबसाठी (Birch By Romeo Lane Club) दारू विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आरोग्य खात्याची बनावट एनओसी (NOC) तयार केल्याप्रकरणी आरोपी गौरव व सौरभ लुथरा यांना न्यायालयाने (Court) सशर्त जामीन मंजूर केला. त्यामुळे या दोघांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘बर्च बाय रोमिओ लेन’ या क्लबला दारू विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप या दोघांवर आहे. या प्रकरणात यापूर्वीच कारवाई करण्यात आली होती. आता दुसऱ्या संबंधित प्रकरणातही जामीन मिळाल्याने लुथरा बंधूंना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या असून; आवश्यक तेव्हा तपासात सहकार्य करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबला आग लागून घडलेल्या मोठ्या दुर्घटनेनंतर थायलंड येथे गेलेल्या लुथरा बंधूंना भारतात आणून अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोघेही कोठडीत होते. यापूर्वी या दोघांना जामीन मंजूर झाला होता. आता आणखी एका प्रकरणात सशर्त जामीन मिळाला आहे.