डझनभर गाड्या बर्फात दबल्या

श्रीनगर : जम्मू -काश्मीर येथील श्रीनगर ते लेह हमरस्त्यावर (Srinagar-Leh highway) झालेल्या हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला तर पाचजण जखमी झाले. डझनभर गाड्या (vehicles) ६ फुटांपेक्षा जास्त बर्फात दबल्या. त्यात अनेकजण गाड्यांमध्ये अडकले व त्यांना बाहेर पडताच आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जोजिला पासजवळच्या झीरो पॉइंटजवळ ही घटना घडली. अचानक हिमस्खलन झाल्याने मोठ्या प्रमाणात बर्फ रस्त्यावरील गाड्यांवर आला. कार, ट्रक तसेच इतर काही एयूव्ही गाड्या त्यात पूर्णपणे दबल्या.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून वाहनांमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पाच जणांना बाहेर काढून त्यांना इस्पीतळात दाखल करण्यात आले व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महामार्गावरील मलबा आणि बर्फ हटवल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली.