
पणजीःवाहतूक खात्याने (TransportDepartment) राज्यातील स्लीपरबसगाड्यांसाठी (Sleeper Buses) ‘ओटोमॅटीव्हइंडस्ट्री स्टेंडर्ड (एआयएस)११९ मार्गदर्शक तत्वेसक्तीची केली आहेत. त्यातकॅबिनसाठी विभाजकीय दरवाजाचीपरवानी रद्द करणे, आणिबाणीच्यामार्गाची सक्ती करणे तसेच आगविझवण्याची यंत्रणा कार्यान्वयीतकरणे; यासारख्याअटी घातल्या आहेत.
३०दिवसांच्या आत या अटींचे पालनकरणे सक्तीचे असल्याचा आदेशवाहतूक खात्याने जारी केलाआहे. वाहतूकखात्याचे संचालक पी. प्रवीमलअभिषेक यांनी जारी केलेल्याआदेशात म्हटले आहे की,राष्ट्रीय मानवाधिकारआयोगाच्या (Human Rights Commission)निर्देशाप्रमाणेएआयएस ११९ आणि रस्ते वाहतुकीसाठीकेंद्रीय संस्थेच्या (सीआयआरटी)सर्व सुरक्षा शिफारशींचीपू्र्ण अंमलबजावणी सुनिश्चीतकरण्यासाठी चार मुख्य अटींचेपालन करणे सक्तीचे आहे.
त्यात चालकाच्याकॅबिनसाठी विभाजकीय दरवाजालापरवानगी नाही. चालकाचेकॅबिन नेहमीच अडथळ्यांविनाअसणे गरजेचे आहे. तसेच१२ मीटर पर्यंत लांबी असलेल्यासर्व बसगाड्यांना किमान चारआणि १२ मीटर पेक्षा जास्तलांबी असलेल्या बसगाड्यांनापाच आणिबाणीचे मार्ग असणेसक्तीचे करण्यात आले आहे.
सर्वस्लीपर कोच बसगाड्यांमध्येआग शोधून काढण्याची व आगविझवण्याची यंत्रणा बसवणेआणि ती चालू स्थितीत ठेवणेअनिवार्य आहे. स्लीपरबसगाड्यांना ‘स्लायडर्स’नकोत. वाहनांच्याचेसित कसलेच अनधिकृत बदल किंवाविस्तार करता येणार नाही.तसेच वाहनांची ‘बॉडी’पूर्णपणे एआयएस ११९ च्याआकारमान आणि मांडणीच्यानिकशांवर असणे गरजेचे आहे.
याबसगाड्यांमध्ये आवश्यक सुधारणाकरण्यासाठी ३१ मार्च २०२६पर्यंत ३० दिवसांची मुदतदेण्यात आली आहे. नियमांचेपालन न केल्यास सर्व बसगाड्यालगेच सेवेतून काढून टाकण्यातयेणार आहेत. आणिप्रचलीत कायद्यानुसार दंडआणि कडक कारवाई करण्यात येणारअसल्याचा इशारा वाहतूक खात्यानेदिला आहे.