ट्रम्प यांनी आयात शुल्क १५ टक्क्यांपर्यंत वाढवले

भारत-अमेरिका व्यापार चर्चा पुढे ढकलल्या

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
ट्रम्प यांनी आयात शुल्क १५ टक्क्यांपर्यंत वाढवले

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सर्व देशांवरील आयात शुल्क (Tarriff) १५ टक्के एवढे वाढवले आहे. या पार्श्वभूमीवर भारत (India) आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार कराराचा मजकूर अंतिम करण्यासाठी वॉशिंग्टन येथे होणारी मुख्य व्यापार वाटाघाटी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. भारतीय प्रतिनिधी मंडळाची तीन दिवसांची चर्चा २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. मात्र; अलीकडील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी दोन्ही बाजूंना अधिक वेळ आवश्यक असल्याने ही बैठक परस्पर सोयीनुसार पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, “भारत-अमेरिका व्यापार करारासंदर्भात भारतीय मुख्य वाटाघाटी प्रतिनिधी आणि त्यांच्या पथकाचा प्रस्तावित अमेरिका दौरा सध्या पुढे ढकलण्यात आला आहे. ताज्या घडामोडी आणि त्यांचे परिणाम यांचे मूल्यांकन करण्यासाठी दोन्ही देशांना वेळ हवा आहे. बैठक परस्पर सोयीनुसार पुन्हा निश्चित केली जाणार आहे.”

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच आयात शुल्क वाढीची घोषणा केली आहे. शुक्रवारी त्यांनी भारतासह सर्व देशांवर १० टक्के आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. हे शुल्क २४ फेब्रुवारीपासून पुढील १५० दिवसांसाठी लागू राहणार आहे. त्यानंतर एका दिवसातच हे शुल्क १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील व्यापार चर्चांवर परिणाम झाला असून, पुढील घडामोडींवर उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा