आग केरी पंचायत क्षेत्रात नव्हे तर पालये टेकडीवर लागली : सरपंच धरती नागोजी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
32 mins ago
आग केरी पंचायत क्षेत्रात नव्हे तर पालये टेकडीवर लागली : सरपंच धरती नागोजी

पेडणे : पेडणे तालुक्यातील (Pernem Taluka) केरी (kerim) पंचायत क्षेत्रातील टेकडीवर आग (Fire) लागल्याची चुकीची माहिती कुणीतरी पसरवत आहे. मात्र, आग केरी पंचायत क्षेत्रात नव्हे तर पालये येथे लागल्याची माहिती केरी पंचायतीच्या (Kerim Panchayat) सरपंच धरती नागोजी यांनी दिली. 

केरी पंचायत क्षेत्रातील टेकडीवर आग लागल्याची माहिती कुणी तरी पसरवली व व्हिडीओ काढून सर्वत्र पाठवले. त्यातून केरी पंचायतीला लक्ष्य करण्यात आले. गेले दोन दिवस ही चुकीची माहिती पसरवली जात आहे. 

मात्र, आग पालये येथील टेकडीवर लागली. आग लागल्याची माहिती मिळताच आपल्या पतीने यासंदर्भात अग्न‌िशमन दलाला माहिती दिली. काहीजणांना सोबत घेऊन रात्रीच टेकडीवर जाऊन पाहिले. मात्र, आग पालये येथील टेकडीवर लागली होती.

केरी पंचायत क्षेत्रात येत नसतानाही आपले पती व सोबत असलेल्यांनी आग विझवल्याची माहिती सरपंच धरती नागोजी यांनी दिली. अशा पद्धतीने चुकीची माहिती पसरवून केरी पंचायतीला लक्ष्य करू नये, असे आवाहनही सरपंच धरती नागोजी यांनी केले.