बोरी येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; गोमेकॉत निधन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
बोरी येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; गोमेकॉत निधन

फोंडा : बोरी (Borim) येथील पेट्रोल पंप (Petrol Pump) जवळ प्रवासी बस (Bus) आणि स्कूटर (Scooter)  यांच्यात झालेल्या अपघातात (Accident) मनोज देसाई (३८ वर्षे, नवदुर्गा मंदिर जवळ- बोरी) यांचा रविवारी सकाळी गोमेकोत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 

शनिवारी सायंकाळी  ४ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार;  जीए-०२-टी -४८५२ क्रमांकाची प्रवासी बस फोंडाहून सावर्डे येथे जात होती. बोरी येथील पेट्रोल पंप जवल पोहोचताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या जीए-०५-क्यू -५७८५ क्रमांकाच्या स्कूटरची प्रवासी बसला समोर जोरदार धडक बसली. यात स्कूटर चालक मनोज देसाई हा गंभीर जखमी झाला.

सर्वप्रथम  १०८ रुग्णवाहिकेतून शिरोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. रात्री उशिरा मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पीतळात दाखल करण्यात आले.   उपचाराला दाद देत नसल्याने; शेवटी मध्यरात्री जखमीला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पीतळात नेण्यात आले. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष वेळीप व हवालदार रामदास गावडे अपघाताचा पंचनामा करीत आहेत.