
पणजी : अर्थसंकल्पीय (Budget) अधिवेशनाचे (Assembly session) कामकाज ठरवण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची (Advisory committee) बैठक बुधवारी २५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे. विधीमंडळ विभागातील सूत्रांकडून ही माहिती मिळाली.
या बैठकीत अर्थसंकल्प मांडण्याची तारीख तसेच अधिवेशनात येणाऱ्या कामकाजावर चर्चा होणार आहे. गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ ते २७ मार्च पर्यंत होणार आहे. राज्यपालांनी अधिवेशनाचे समन्स जारी केले आहे. विविध खात्यांकडे बैठक घेण्यासहीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पाची तयारी केली आहे. दर दिवशी येणाऱ्या लक्षवेधी सूचना, खासगी प्रस्ताव तसेच चर्चेसाठी आमदारांना किती वेळ द्यावा, यावर बैठकीत चर्चा होणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन १४ दिवसांचे असणार आहे. अधिवेशन कमी दिवसांचे असल्याने, मुद्दे मांडण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात वेळ मिळणार नाही, अशी टीका विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन जास्त दिवसांचे असते. यावेळी ते कमी दिवसांचे होणार, अशी टीका विरोधी पक्षानी केली आहे.