सावधान! देशातील 'ही' ३२ विद्यापीठे बनावट; युजीसीने जाहीर केली यादी

दिल्लीत सर्वाधिक बनावट विद्यापीठे; महाराष्ट्रातील दोन संस्थांचाही समावेश.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
21st February, 03:24 pm
सावधान!  देशातील 'ही' ३२ विद्यापीठे बनावट; युजीसीने जाहीर केली यादी

नवी दिल्ली: देशातील उच्चशिक्षण व्यवस्थेत मोठी खळबळ उडवणारी घोषणा करत विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील ३२ संस्थांना ‘बनावट विद्यापीठ’ म्हणून जाहीर केले आहे. या संस्थांकडे केंद्र किंवा राज्य सरकारची कोणतीही मान्यता नसून, त्यांनी दिलेल्या पदव्या नोकरी व पुढील शिक्षणासाठी वैध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ‘यूजीसी कायदा कलम २(एफ) आणि ३’ चा उल्लेख करत या संस्थांना पदवी प्रदान करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचे नमूद केले आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित संस्थेची मान्यता तपासूनच निर्णय घ्यावा, असे आवाहनही आयोगाने केले आहे.


दिल्लीमध्ये सर्वाधिक १२ बनावट विद्यापीठे


राज्यांनुसार पाहता दिल्लीमध्ये सर्वाधिक १२ बनावट विद्यापीठे आढळली आहेत. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये ४ संस्था बनावट असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


राज्यनिहाय बनावट विद्यापीठांची संख्या (फेब्रुवारी २०२६ पर्यंत):


दिल्ली: १२, उत्तर प्रदेश: ४, आंध्र प्रदेश: २, कर्नाटक: २, केरळ: २, महाराष्ट्र: २, पुड्डुचेरी: २, पश्चिम बंगाल: २, अरुणाचल प्रदेश: १, हरियाणा: १, झारखंड: १, राजस्थान: १.


अ. क्र.राज्यविद्यापीठाचे नाव आणि पत्ता
आंध्र प्रदेशख्रिस्त न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, गुंटूर
आंध्र प्रदेशबायबल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया, विशाखापट्टणम
अरुणाचल प्रदेशइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, सचिवालय एस.ओ.
दिल्लीवर्ल्ड पीस ऑफ युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी (WPUNU), पीतमपुरा
दिल्लीइन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग, कोटला मुबारकपूर
दिल्लीऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस (AIIPHS), अलीपूर
दिल्लीकमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दर्यागंज
दिल्लीयुनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, दिल्ली
दिल्लीव्होकेशनल युनिव्हर्सिटी, दिल्ली
१०दिल्लीएडीआर-सेंट्रिक ज्युरिडिकल युनिव्हर्सिटी, राजेंद्र प्लेस
११दिल्लीइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग, नवी दिल्ली
१२दिल्लीविश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ-एम्प्लॉयमेंट, संजय एन्क्लेव्ह
१३दिल्लीआध्यात्मिक विश्वविद्यालय (स्पिरिचुअल युनिव्हर्सिटी), रोहिणी
१४हरियाणामॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी, फरिदाबाद
१५झारखंडदक्ष युनिव्हर्सिटी (व्होकेशनल अँड लाईफ स्किल एज्युकेशन), रांची
१६कर्नाटकसर्व भारतीय शिक्षा पीठ, तुमकूर
१७कर्नाटकग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी, बेंगळुरू
१८केरळइंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ प्रोफेटिक मेडिसिन (IIUPM), कोझिकोड
१९केरळसेंट जॉन्स युनिव्हर्सिटी, किशनट्टम
२०महाराष्ट्रराजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नागपूर
२१महाराष्ट्रनॅशनल बॅकवर्ड कृषी विद्यापीठ, तडवळ (ता. अक्कलकोट, सोलापूर)
२२नवी दिल्लीनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सोल्यूशन, जनकपुरी
२३नवी दिल्लीमाउंटन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, नेहरू प्लेस
२४पुद्दुचेरीउषा लाचूमनन कॉलेज ऑफ एज्युकेशन, थिरुक्कनूर
२५पुद्दुचेरीश्री बोधी अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, वाळुथावूर रोड
२६राजस्थानराजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, भिवाडी (अलवर)
२७उत्तर प्रदेशगांधी हिंदी विद्यापीठ, प्रयागराज (अलाहाबाद)
२८उत्तर प्रदेशनेताजी सुभाषचंद्र बोस युनिव्हर्सिटी (ओपन युनिव्हर्सिटी), अलीगढ
२९उत्तर प्रदेशभारतीय शिक्षा परिषद, लखनऊ
३०उत्तर प्रदेशमहामाया टेक्निकल युनिव्हर्सिटी, नोएडा
३१पश्चिम बंगालइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, कोलकाता
३२पश्चिम बंगालइन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च, ठाकूरपुकूर, कोलकाता


महाराष्ट्रातील दोन संस्था यादीत:


महाराष्ट्रातील नागपूर येथील 'राजा अरेबिक युनिव्हर्सिटी' आणि सोलापूर येथील 'नॅशनल बॅकवर्ड कृषी विद्यापीठ' या दोन संस्थांचा या यादीत समावेश आहे.


विद्यार्थ्यांना सतर्कतेचे आवाहन


यूजीसीने स्पष्ट केले आहे की, या बनावट संस्थांकडून देण्यात येणाऱ्या पदव्या कोणत्याही शासकीय किंवा खासगी नोकरीसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेशापूर्वी विद्यापीठाचे नाव यूजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासावे, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा