शिवाजी महाराजांच्या पुतळ्या विरोधात मुरगाव बंदराची उच्च न्यायालयात धाव

बेकायदा पुतळा काढून टाकण्याची याचिकेत मागणी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
19th February, 04:12 pm
शिवाजी महाराजांच्या पुतळ्या विरोधात मुरगाव बंदराची उच्च न्यायालयात धाव

पणजी : सडा- वास्को (Vasco) येथे चौकात ज्या जागेवर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे ती जागा मुरगाव बंदर प्राधिकरणाची (एमपीए)  (MPA) आहे. एमपीएच्या मान्यतेशिवाय उभारला जात असलेला हा पुतळा बेकायदा असून; काढून टाकण्याचे आदेश सरकारी यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मुरगाव बंदर प्राध‌िकरणाने गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दाखल केला आहे. 

या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिवप्रेमी नागरिकांनी सडा येथील मोकळ्या जागेत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची तयारी चालवली आहे. या पुतळ्याचे शिवजयंती दिनी आज सायंकाळी अनावरण होणार आहे. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे हा पुतळा वादग्रस्त ठरणार आहे.

हा पुतळा खासगी जागेत उभारण्यात येत असल्याने तो बेकायदा आहे. तो मोडण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी (South Goa Collector) तसेच सरकारी यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी याचिकेत आहे. पुतळ्याचे अनावरण झाले तरी त्यावर टांगती तलवार कायम राहणार आहे. यामुळे पुतळ्याचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा