गोव्यात दर ३ महिन्यांनी होते ११ अतिप्रदूषित औद्योगिक युनिट्सची तपासणी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
19th February, 03:06 pm
गोव्यात दर ३ महिन्यांनी होते ११ अतिप्रदूषित औद्योगिक युनिट्सची तपासणी

पणजी : गोव्यातील (Goa) ११ अतिप्रदूषणकारी औद्योगिक युनिट्सचे (Highly Polluting Industrial Units) दर तीन महिन्यांनी तपासणी होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या (CPCB) अखत्यारीत ही युनिट्स येतात. 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केल्यानंतर अत्यंत प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक युनिट्सची वारंवार तपासणी करणे आवश्यक आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाने (GSPCB) या उद्योगांसाठी एक देखरेख कक्ष स्थापन केला आहे.

नव्या नियमांनुसार, अत्यंत प्रदूषण करणाऱ्या युनिट्सची तपासणी तीन महिन्यांतून किमान एकदा करावी लागते.  आणि बोर्डाने ही प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. गोव्यातील ही ११ युनिट्स बेतोडा, उसगाव, पिसुर्ले, सांगे, कुंकळ्ळी, झुवारीनगर, आमोणा आणि खोर्ली येथे आहेत. 

बोर्डाला यासंदर्भात २०१९ साली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून निर्देश प्राप्त झाले होते.  त्यानुसार प्रदूषणकारी युनिट्सची पर्यावरणीय तपासणी करण्याचे सूचित केले होते.  पाणी (प्रदूषण प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा, १९७४ व हवा (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा १९८१ नुसार ही तपासणी करण्याचे त्यात समाविष्ट होते.

केंद्रीय बोर्डाच्या माहितीनुसार, राज्य बोर्ड प्रदूषण नियंत्रण कार्यकमाच्या नियोजन व अंमलबजावणीस जबाबदार आहेत तर केंद्रीय बोर्ड त्यांना समन्वय व मार्गदर्शन करते. केंद्रीय बोर्डाने विविध उद्योगांच्या श्रेणी केल्या आहेत. त्यानुसार तपासणीही करण्यात येते. 

हेही वाचा