कुंकळ्ळीतील नव्या ‘फिश मील प्लांट’ची संमती १० दिवसांत मागे घ्या : युरी आलेमाव

अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
17th February, 04:55 pm
कुंकळ्ळीतील नव्या ‘फिश मील प्लांट’ची संमती १० दिवसांत मागे घ्या : युरी आलेमाव

पणजी : कुंकळ्ळीतील (Cuncolim) नव्या ‘फिश मील प्लांट’ला (Fish Meal Plants) दिलेली संमती १० दिवसांत मागे न घेतल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा कुंकळ्ळीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिला आहे. 

कुंकळ्ळीत नव्या ‘फिश मील प्लांट’ला संमती दिल्याच्या विरोधात मंगळवारी कुंकळ्ळी येथे स्थानिक एकत्र आले. त्यावेळी उपस्थितांना आमदार युरी आलेमाव यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी वरील इशारा दिला. कुंकळ्ळीतील काही ‘फिश मील प्लांट’ केवळ कुंकळ्ळीवासियांनाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या (International consumers) जीवाशीही खेळत आहेत.

याठिकाणी शिळ्या मासळीवर प्रक्रिया केली जाते. पुढील १० दिवसांत नव्या फिश मीलला दिलेली संमती मागे न घेतल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा युरी आलेमाव यांनी दिला. आणि त्याची जबाबदारी सरकारवर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.