१५० उमेदवारांची नियुक्ती यादी प्रसिद्ध. या पदांसाठी कर्मचारी भरती आयोगातर्फे मे २०२५ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

पणजी : कर्मचारी भरती आयोगातर्फे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या भरतीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यानुसार १५० उमेदवारांची नियुक्ती यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, तपशीलवार निकाल आणि प्रतीक्षा यादी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पदांसाठी मे २०२५ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
यादीमध्ये १४० पुरुष उमेदवारांचा समावेश
निवड झालेल्या यादीमध्ये १४० पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातील ८०, एसटी १९, एससी ३, ओबीसी ४१ आणि ईडब्ल्यूएस (EWS) ७ जागांचा समावेश असून, प्रतीक्षा यादीत ५९ उमेदवारांना स्थान मिळाले आहे. याशिवाय, महिला पोलीस उपनिरीक्षक पदांच्या १० जागांचा निकालही जाहीर झाला आहे. यामध्ये ९ जागा खुल्या प्रवर्गातील, तर १ जागा एसटी प्रवर्गासाठी राखीव आहे.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
महिला पोलीस उपनिरीक्षक पदांच्या १० जागांचा निकालही जाहीर
आयोगाने स्पष्ट केले आहे की, ज्या उमेदवारांनी जात किंवा समुदाय आरक्षणानुसार वयोमर्यादेत सवलत घेतली आहे, त्यांना संबंधित श्रेणीत ठेवण्यात आले आहे. तसेच, ज्या उमेदवारांनी विभागीय उमेदवार किंवा शासकीय कर्मचारी म्हणून सवलत मिळवली आहे आणि त्यांना अनुसूचित जाती, जमाती किंवा ओबीसी प्रवर्गातून कोणतीही अतिरिक्त सवलत मिळालेली नाही, अशा उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार (Merit) अनारक्षित प्रवर्गाच्या गुणवत्ता यादीत स्थान देण्यात आले आहे.